केज दि.१(प्रतिनिधी) : तालुक्यातील टाकळी येथील विलास नवनाथ घुले खून प्रकरणातील संपाताचा वणवा आता आणखी पेटला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) ज्यांची ४ तास कसून चौकशी केली होती, त्या खासदार पुत्र सौरव सोनवणे याला तात्काळ अटक करण्यात यावी, आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी विलास घुले यांच्या कुटुंबीयांनी बुधवारी १ जुलै २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजता टाकळी येथील पाण्याच्या उंच जलकुंभावर (Water Tank) चढून थेट 'शोले स्टाईल' आंदोलन सुरू केले आहे. या अचानक झालेल्या आंदोलनामुळे केज पोलीस प्रशासनाची प्रचंड धावपळ उडाली असून संपूर्ण तालुक्यात तणाव निर्माण झाला आहे.
बातमी शेअर करा

