Advertisement

दोन रिक्षांची समोरासमोर धडक

प्रजापत्र | Sunday, 28/06/2026
बातमी शेअर करा

 किल्ले धारूर दि.२८(प्रतिनिधी): धारूर–आडस मार्गावरील पांगरी ते कोळपिंप्री दरम्यान असलेल्या पुलावर शनिवार (दि. २७) रोजी दुपारी प्रवासी ऑटो रिक्षा आणि मालवाहतूक ऑटो यांच्यात झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यु झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलविण्यात आले.
   अधिक माहितीनुसार, मालवाहतूक ऑटो (क्र. एमएच- ४०-इ- ५७४५) आणि प्रवासी ऑटो रिक्षा (क्र. एमएच- २३- एक्स- ४९९०) यांची पुलावर समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात बंडोबा ईखे (वय ३०) रा. कसबा धारूर यांचा मृत्यू झाला. ते धान्य घेऊन प्रवासी ऑटोने अंबाजोगाईकडे जात होते. या अपघातात प्रवासी ऑटोचे चालक रतन धोंडीबा कुरवडे हे जखमी झाले असून, आणखी एक जण जखमी झाला आहे. दोघांनाही तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

 

Advertisement

Advertisement