मुंबई: इंधन पुरवठ्याबाबत सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेल विशेषतः डिझेलबाबत योग्य ते नियोजन करावे. कारण शेतीच्या कामांसाठी आता डिझेल वापर वाढेल. त्यामुळे इंधनाची साठेबाजी होऊ देऊ नका. आवश्यकतेनुसार डिझेल मिळायला हवे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. परंतु, ही तणावाची स्थिती सर्व दूर नाही. एखाद्या ठिकाणी काही घटना होत आहे आणि तीच हायलाइट होत आहे. परंतु, तसेही घडू नये, याची काळजी घेतली जात आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
बातमी शेअर करा

