Advertisement

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा मृत्यु 

प्रजापत्र | Tuesday, 19/05/2026
बातमी शेअर करा

माजलगाव दि.१९(प्रतिनिधी): पाथरी ढालेगाव परिसरात राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत रेनापुरी येथील दोन तरुण सख्या भावांचा जागीच मृत्यु झाला. सदरील घटना सोमवार (दि.१८)रोजी रात्री अकराच्या सुमारास घडली असुन या घटनेमुळे रेणापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
    माजलगाव तालुक्यातील रेणापुरी येथील रवींद्र शिवाजी गडसिंगे (वय २७) व विशाल शिवाजी घडशिंगे (वय २४)  दोघे भाऊ (एम.एच.४४ ए.बी. २६२६) या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून जात असताना ढालेगाव-पाथरी दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. अपघात इतका गंभीर होता की दोघांचाही जागीच मृत्यु झाला.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.या घटनेमुळे रेणापूर गावावर शोककळा पसरली असून,अज्ञात वाहनाचा तपास संबंधित पोलिसांकडून सरू आहे.

Advertisement

Advertisement