बीड दि.१० (प्रतिनिधी):परळी-गंगाखेड रोडवरील दगडवाडी येथील कॅनॉलच्या पुलावर एसटी बस चालकाचा ताबा सुटल्याने रविवार (दि.१०) रोजी अपघात झाला.
परळीत प्रवाशांनी भरलेली एसटी बस चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याखाली गेली आहे. बसमध्ये अनेक प्रवासी असून त्यांना बाहेर काढले आहेत. परळी-गंगाखेड रोडवरील दगडवाडी जवळील कॅनॉलच्या पुलावर ही घटना रविवार (दि.१०) रोजी दुपारी घडली असून सुदैवाने कॅनालमध्ये बस जाता जाता राहिली अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती. दुपारी उशिरा पर्यंत अपघातस्थळी बस बाजूला घेण्याचे प्रयत्न सुरू होते.
बातमी शेअर करा

