मुंबई : देशात इंधनाचा तुटवडा असून लवकरच कोरोनाप्रमाणे लॉकडाऊन (Lockdown) लागणार, अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थतेची स्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. त्यावर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या देशात इंधनाचा पुरेसा साठा आहे, त्यामुळे कोणतेही संकट नाही. देशात कोणतेही लॉकडाऊन लागणार नाही, तशा आशयाच्या अफवा जर कुणी परसवत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "देशात कोणताही लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. त्यामुळे या विषयी कोणतीही अफवा पसरवण्याऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. अशा प्रकारचे फेक व्हॉट्सॲप मेसेज जरी फॉरवर्ड केली तरी तो गुन्हा ठरेल. त्यामुळे कुणीही खोट्या अफवा पसवरू नये, अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार."

