Advertisement

सुसाईड नोट आणि व्हिडीओ व्हायरल करुन महाराज बेपत्ता

प्रजापत्र | Sunday, 07/02/2021
बातमी शेअर करा

गेवराई : तालुक्यातील कोळगांवयेथील सुर्यमंदिर संस्थानच्या मठाधिपतीवर एका 14 वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात हनुमान महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर या महाराजांनी (दि.7) सकाळी सुसाईड नोट लिहून सोशल मीडियावर आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल केला. यानंतर हे महाराज संपूर्ण दिवस बेपत्ता असल्याने खळबळ उडाली. चकलांबा पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून रात्री उशीरापर्यंत महाराजांचा ठावठिकाणा लागला नव्हता.


31 जानेवारी रोजी हनुमान महाराज यांनी एका 14 वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केला असल्याची तक्रार चकलांबा पोलीस ठाण्यात नोंदविली होती. त्यानंतर महाराजांवर विनयभंग आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारी महाराजांनी फेसबुक लाईव्ह करत आपल्याला बदनाम करण्यासाठी कटकारस्थाने रचली जात आहेत. मला बदनाम करण्याच्या हेतूने हा सर्व प्रकार सुरु आहे.  माझा कुठलाही दोष नसताना माझ्यावर हे आरोप करण्यात आले. यामुळे आता मला जगण्याची इच्छा नसून मी आत्महत्या करीत आहे. त्यामुळे माझ्या आत्महत्येस प्रवृत्त असणार्‍याविरोधात गुन्हा दाखल करावा असे त्यांनी म्हटले आहे. फेसबुकवरही त्यांनी व्हिडीओ व्हायरल केला होता. रविवारी दिवसभर या व्हिडीओची मोठी चर्चा झाली. रात्री उशीरापर्यंत महाराजांचा ठावठिकाणा लागला नव्हता. दरम्यान चकलांबा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.

चौसाळ्यात अफवांचे पेव
दरम्यान रविवारी रात्री उशीरा 10 च्या सुमारास चौसाळा येथे विविध अफवांना पेव फुटले होते. या परिसरात महाराजांनी आत्महत्या केली असल्याची अफवा होती मात्र याला पोलीस प्रशासनाकडून दुजोरा मिळाला नाही. चकलांबा आणि चौसाळा पोलीस रात्री उशीरापर्यंत महाराजांचा ठावठिकाणा घेत होते.

 

हनुमान महाराजांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ वायरल केला होता. 
व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. 

https://youtu.be/zefnA-AuvUE

Advertisement

Advertisement