बीड-माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहूल सुर्यतळ यांची पोलीस अधिक्षकांनी लाचप्रकरणाचा ठपका ठेवून उचलबांगडी केल्याची माहिती समोर येत आहे.वाळूच्या प्रकरणात २० हजारांची लाच घेताना एका पोलीस कर्मचारी आणि खाजगी इसमाला रंगेहाथ पकडल्यानंतर एसपींनी तात्काळ कारवाई करत प्रभारी अधिकार्याला नियंत्रण कक्षात बदली करत दणका दिला आहे.
बीड जिल्ह्यात वाळूचा प्रश्न ज्वलंत आहे.वाळूमुळेच अनेक अधिकार्यांवर लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने कारवाया केल्या आहेत. माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सुर्यतळ यांच्या ठाण्यातील कर्मचारी अमोल कदम याने वाळूच्या प्रकरणात 20 हजाराच्या लाचेची मागणी केली होती. यावेळी एसीबीने लाच घेताना कदम सह एका खाजगी व्यक्तीला रंगेहात ताब्यात घेतले. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाल्यानंतर पोलीस अधिक्षकांनी तडकाफडकी प्रभारी अधिकारी असलेल्या राहुल सुर्यतळ यांची नियंत्रण कक्षात बदली करून त्या ठिकाणी होम डिवायएसपी असलेल्या उमाशंकर कस्तुरे यांच्याकडे माजलगाव ठाण्याची सूत्रे सोपावली आहेत.तर नियंत्रण कक्षातून गात यांची बदली करत त्यांच्याकडे आता होम डीवायएसीपीचा पदभार देण्यात आला.

बातमी शेअर करा
