चकलांबा दि.१७ (वार्ताहार):गेवराई तालुक्यातील तांदळा शिवारातील विहरीवरील एक सोलार मोटर अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवार (दि.११) रोजी घडली असून एकूण १,००,००० रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत असून चोरट्यांनी आता आपला मोर्चा शेतकऱ्यांकडे वळवला आहे. गेवराई तालुक्यातील तांदळा येथील शेतकरी काकासाहेब साहेबराव सिरसाट (वय ५०) यांच्या गट क्र ४७९ या शेतातील विहरीवरील लावलेली सोलार मोटार अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवार (दि.११) रोजी संध्याकाळी घडली असून एकूण १,००,००० रुपयांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध काकासाहेब सिरसाट यांच्या फिर्यादीवरून चकलांबा पोलीस ठाण्यात शुक्रवार (दि.१६) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

