केज-येथे बोगस बियाण्यांच्या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे व्यापारी आणि संबंधित कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. शेतकऱ्यांना बोगस बियाणांची विक्री करणे कंपनी व व्यापाऱ्यांच्या अंगलट येणार हे निश्चित असून शेतकऱ्यांच्या फसवणुकीची प्रशासनाने दखल घेतली आहे.
केज तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवले नसल्याच्या सुमरे दीड हजाराच्यावर तक्रारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि पंचायत समिती कृषी विभागाकडे केल्या होत्या तर नांदुघाट येथे एका शेतकऱ्याने सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्यामुळे अंगावर ज्वालाग्रही पदार्थ अंगावर ओतून घेऊन आत्मदहन करणण्याचा देखील प्रयत्न केला होता दरम्यान प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी कार्यालया मार्फत प्रत्यक्ष शेतात जाऊन माहिती व अहवाल घेतल्या नंतर अनेक शेतकऱ्यांचे बियाणे न उगवल्याचा निश्चित झाले आणि या मागे निकृष्ट व बोगस बियाणे असल्याचे निष्पन्न झाले त्या नुसार आज ४ जुलै रोजी तालुका स्तरीय कृषी निविष्ठा तक्रार निवारण समितीचे अध्यक्षे तथा तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत देशमाने यांच्या तक्रारी वरून महागुजरात सिड्स कंपनीचे अशोक नथुरामजी यांच्या विरोधात गु. र. न. २५७/२०२० भा द वि ४२०, ३४ सह बियाणे नियम १९६८ चे कलम २३(ड), ६(ब), ७(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तालुका स्तरीय कृषी निविष्ठा तक्रार निवारण समितीचे सचिव तथा पंचायत समिती केजचे तालुका कृषी अधिकारी अमोल डाके यांच्या तक्रारी वरून वरदान बायोटेक प्रा. लि. उज्जान (मध्यप्रदेश) चे लोकेंद्र राजपूत व रश्मी राजपूत यांच्या विरोधात गु. र. न. २५८/२०२० भा द वि ४२०, ३४ सह बियाणे नियम १९६८ चे कलम २३(ड), ६(ब), ७(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर शेतकऱ्यांच्या फसवणुकी प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे पुढील तपास करीत आहेत.
प्रजापत्र | Saturday, 04/07/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा