Advertisement

गेवराईच्या युवकाची रावेर मध्ये निर्घून हत्या |

प्रजापत्र | Friday, 05/02/2021
बातमी शेअर करा

अविनाश इंगावले 
गेवराई दि ५ ( वार्ताहार ) गेवराई शहरातील चिंतेश्वर भागात रहिवासी असलेला भोळसर तरूण यांचा दि ३ फेग्रूवारी रोजी रावेर जिल्हा जळगाव येथे खुन झाल्याची घटना घडली दोरीने गळा आवळून या युवकांचा चार जणांनी टपरी फोडण्याच्या संशयावरूण खुन केला असल्याची माहीती जळगावचे पोलीस अधीक्षक मुंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहीती दिली आहे .

   सौरभ गणेश राऊत वय १९ वर्ष रा . चिंतेश्वर गल्ली गेवराई जिल्हा बीड असे या युवकांचे नाव असुन युवक हा भोळसर होता यापुर्वी देखील त्याला कर्नाटक आणि सुरत येथून नातेवाईकांनी शोधून आनले होते परंतू गेल्या दोन महिन्यापासुन हा युवक घरातून निघून गेला असल्यांची माहिती आहे दि ४ रोजी नातेवाईक यांना रावेर पोलीसांनी एका अनओळखी मृत्युदेह ओळखण्यासाठी बोलवले असता तो हाच तरूण आहे यांची खात्री पटली .

   रावेर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात टपरी फोडण्याच्या कारणावरूण खुन झाला आहे तत्पुर्वी पोलीसांना हा विषय वेगळा वाटत होता परंतू रावेर पोलीसांनी चोविस तासांत प्रकणाचा छडा लावला असल्याने पोलीस अधीक्षक मुंडे यांनी ३५ हजारांचे पारितोक्षिक जाहिर केले आहे तारेवरची कसरत करत अनओळखी खुनाचा तपास पोलासांनी लावला आहे मयताच्या अंगात घातलेल्या शर्टच्या टॅगवरून मयताची ओळख पटली तसेच नायलोनच्या दोरीने गळा आवळला असल्याचा वैधकीय अहवाल नुसार शरातील सिसीटिव्ही फुटेज बारकाईने तपास केल्यानंतर चार संशयीत आरोपी पकडण्यात रावेर पोलीसांना यश आले असुन याबाबद पोलीस अधीक्षक डॉ मुंडे यांनी हि माहीती पत्रकार परिषद घेऊन सांगितली आहे .

गेवराई शहरात सर्वत्र हळहळ 
शहरात ही घटना समजल्यानंतर चिंतेश्वर गल्लीत मोठी गर्दी जमा झाली होती या युवकांचे वडील गणेश राऊत हे सर्वत्र परिचयाचे असल्याने अतिषय शांत व संयमी स्वभावाचे असल्याने संपुर्ण गेवराई शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे

Advertisement

Advertisement