Advertisement

वाल्मीक कराडचा जामिन फेटाळला

प्रजापत्र | Wednesday, 17/12/2025
बातमी शेअर करा

बीड: संतोष देशमुख (Santosh Deshmukh murder) हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडचा (Walmik Karad) जामिन अर्ज(Bail ) आज (दि.१७) उच्च न्यायालयाने फेटाळला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे(High court ) न्या. सुशील घोडेस्वार यांनी हा निर्णय दिला. 
वाल्मीक कराडच्या जामीन अर्जावर मागच्या दोन तारखांना युक्तीवाद झाला होता, आज यात पुन्हा युक्तीवाद झाला. अखेर सरकार पक्ष आणि फिर्यादी पक्षाने केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्या. सुशील घोडेस्वार यांनी कराडचा जामिन फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने अमरजितसींह गिरासे यांनी तर फिर्यादी कडून नितीन गवारेपाटील यांनी युक्तीवाद केला होता. तर वाल्मीक कराडच्या वतीने सिनिअर कौन्सिल शिरीष गुप्ते यांनी बाजू मांडली होती. या निर्णयाकडे सर्व जिल्हयाचे लक्ष लागले होते.

Advertisement

Advertisement