बीड दि.१७ (प्रतिनिधी): मुकादमाकडून तीन मजुरांनी पैसे घेऊनही ऊसतोडणीला जाण्यास नकार देत उलट मुकादमास जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंगद कोंडीराम शिंगण रा. नागापूर ता.जि.बीड यांनी रावसाहेब पवार, सोमनाथ पवार, शांताराम पवार यांना प्रत्येकी ४५,००० हजार रुपये उच्चल दिली होती. उच्चल घेऊनही हे तिघे जण ऊसतोडणीला जाण्यास नकार देऊ लागले. उलट मुकादमास शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तिघांविरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुरुवार (दि.१६) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
बातमी शेअर करा