Advertisement

जनावरे चोरणारी टोळी गजाआड

प्रजापत्र | Thursday, 04/09/2025
बातमी शेअर करा

बीड दि.४(प्रतिनिधी):शहरातील गांधी नगर येथील एका तरुणाने जनावरे चोरून आणल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर बुधवार (दि.३)रोजी कारवाई करत करत पाच जनावरे व दोन वाहने हस्तगत केली. या कारवाईत ८,७९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले तर दोन आरोपी फरार आहेत.  

    नितीन संजय जाधव रा.गांधीनगर बीड याने चार चाकी वाहनांमध्ये जनावरे चोरुन आणल्याची माहीती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता कारवाई करत नितीन जाधवला ताब्यात घेवुन चोरी केलेले तीन जनावरे हस्तगत केले. या बाबत विचारपुस केली असता त्याने कुंभारवाडी परीसरातुन जनावरे चोरल्याचे कबुल केले आहे. त्याच्या कडुन शेळया चोरीचे गुन्हे उघडकीस करण्यात आले आहेत. तसेच दिपक चंदु गुंजाळ रा.गांधीनगर यास देखील गांधीनगर येथुन ताब्यात घेवुन त्याच्या ताब्यातुन दोन जनावरे व चोरी करण्यासाठी वापरात आनलेले वाहन असे जप्त करुन त्याच्या कडुन अन्य गुन्हे उघडकीस आनले आहेत.वरील दोन्ही प्रकरणात एकुण चार आरोपी निष्पन्न झाले असुन दोघांना अटक करण्यात आले असून दोन फरार आरोपींचा शोध पोलीस ठाणे शिरुर व गेवराई हे घेत आहेत. चार जनावरे,वाहने असा एकुण ८,७९,०००रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सदरील कामगिरी नवनित काँवत, पोलीस अधीक्षक, बीड, श्री सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक बीड, श्री शिवाजी बंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, आशपाक सय्यद, मनोज परजणे, विकी सुरवसे, महीला पोलीस हवालदार स्वाती मुंडे चालक सिध्देश्वर मांजरे यांनी केली.

Advertisement

Advertisement