Advertisement

पार्वतीबाई ढाकणे यांचे निधन

प्रजापत्र | Wednesday, 03/09/2025
बातमी शेअर करा

हातगाव शेवगाव प्रतिनिधी : अहिल्यानगर तालुका शेवगाव मु. पो. ढाकणे वस्ती पैठण पंढरपूर  महामार्ग हातगाव मधील रहिवासी असणाऱ्या कुशल शेतकरी असणाऱ्या कै. पार्वती बाई विश्वनाथ ढाकणे यांचे 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता वर्धापकाळाने वयाच्या80 व्या वर्षी निधन झाले मूळच्या पाथर्डी तालुक्यातील भगवानगड परिसरातील ढाकणवाडी गावच्या त्या रहिवासी होत्या एकत्रित कुटुंब पद्धतीत 40 वर्षांपूर्वी हातगाव येथे ढाकणे परिवाराने पैठणच्या उजव्या कालव्या खाली शेती घेतली होती कुशल व प्रगतशील शेतकरी म्हणून त्या परिसरात चांगलं उत्पादन घेत होत्या स्वतः अशिक्षित असून आपल्या एका मुलाला व सुनेला शिक्षण घ्यायला लावून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात शिक्षक म्हणून गरुड झेप घ्यायला लावण्यात या मातेचे योगदान मोठे होते.. बा. मा. पवार माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज बिरदवडी चाकण चे  व वंजारी ओबीसी विकास महासंघाचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख श्री दादासाहेब ढाकणे सर यांच्या त्या मातोश्री होत्या तर खेड तालुका माध्यमिक शिक्षक सेवक पतसंस्थेच्या संचालिका व कन्या विद्यालय चाकण च्या उपशिक्षिका सौ. आशा दादासाहेब ढाकणे यांच्या त्या सासुबाई होत्या.. ढाकणवाडी चे मा. 3 टर्म सरपंच श्री विश्वनाथ दादा ढाकणे यांच्या त्या पत्नी होत्या त्यांच्या पश्चात 2 मुली2 मुले नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या जाण्याने परिसरातून व शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातून नागरिकातून व नातेवाईकातून श्रद्धांजलीचा वर्षाव व्यक्त करून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.. त्यांचा दशक्रिया विधी दिनांक 10 सप्टेंबर वार बुधवार रोजी श्री क्षेत्र पैठण येथे नाथ मंदिराच्या पाठीमागे सकाळी विधीला 8 वाजता सुरुवात होणार आहे. तरी आमच्या दुःखात सहभागी होणाऱ्या सर्व गावकऱ्यांनी नातेवाईकांनी उपस्थित राहावे असे आवाहन लहान चिरंजीव श्री बाळासाहेब ढाकणे व नातू श्री महारुद्र ढाकणे यांनी ढाकणे परिवाराच्या वतीने सर्वांना केले आहे.

Advertisement

Advertisement