Advertisement

अखेर अविनाश बारगळ यांचा वनवास संपला

प्रजापत्र | Friday, 27/06/2025
बातमी शेअर करा

 

बीड-बीडचे तत्कालीन पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांची गृहमंत्री यांनी तडकाफडकी बीडमधून बदली केल्यानंतर ते पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते.अखेर त्यांना दीर्घकाळानंतर गृह विभागाच्या वतीने नियुक्ती देण्यात आली आहे.लातूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे घटकप्रमुख म्हणून ते पदभार घेणार आहेत.
                 नंदकुमार ठाकूर यांच्या जागी अविनाश बारगळ बीडला आले होते.मात्र ते रजेवर असताना मस्साजोगमधील दिवंगत संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली.याप्रकरणात सरकारने त्यांच्यावर ठपका ठेवत त्यांची तडकाफडकी उचलबांगडी केली होती.नवनीत कॉवत यांनी बीडला पदभार घेतल्यापासून ते पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते.जवळपास सहा महिन्यानंतर त्यांना नियुक्ती मिळाली असून ते आता  लातूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस अधिक्षक म्हणून कारभार पाहणार आहेत.

Advertisement

Advertisement