बीड दि.२६(प्रतिनिधी): जिल्ह्यातील(Beed) शैक्षणिक संकुल समजल्या जाणाऱ्या उमाकिरणमधील दोन शिक्षकांवर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात (Crime)आला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून गुरू शिष्याच्या नात्याला देखील काळिमा फासला गेला आहे.
बीड (Beed)जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेसचे एकमेव ठिकाण अशी ओळख उमाकिरणच्या वतीने करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे क्लास एकाच छाताखाली सुरु करण्यात आले होते. दरम्यान काही वेळापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे आरोपीचे नावे असल्याचे समजते. शिवाजीनगर(Beed police) पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बातमी शेअर करा