माजलगाव दि.१५(प्रतिनिधी):माजलगाव ते मंजरथ रोड लगत असलेल्या नवीन ईदगाह समोर ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती माजलगाव शहर पोलिसांना मिळताच रविवार (दि.१५) रोजी कारवाई करत ०३,०५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाया सुरु असून तरी देखील वाळूची चोरटी वाहतूक होताना दिसत आहे.माजलगाव ते मंजरथ रोड लगत असलेल्या नवीन ईदगाह समोर ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक करताना चालक संजय पांडुरंग अडागळे रा.खापरवाडी ता.वडवणी जि.बीड व अश्फाक बेग अफेमद बेग रा.गांधनपूरा माजलगाव (ट्रॅक्टर मालक) यांच्यावर माजलगाव शहर पोलिसांनी रविवार (दि.१५) रोजी कारवाई केली यात सोनालीने कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच १२ केजे ८९९८ अंदाजे किंमत ३,००००० व त्यामध्ये असलेली एक ब्रास वाळू अंदाजे किंमत ५,००० रुपये असा एकूण ०३,०५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरची कारवाई नवनीत कॉवत पोलीस अधीक्षक बीड,चेतना तिडके,अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ,सपोनि प्रल्हाद मुंडे,पोउपनि संदीप राठोड,पो अंमलदार अमोल कदम,शिवगणेश मिरकले यांनी केली.