Advertisement

पेठ बीड पोलिसांची गुटख्यावर कारवाई

प्रजापत्र | Saturday, 14/06/2025
बातमी शेअर करा

 बीड दि.१४ (प्रतिनिधी ): पेठ बीड(Beed)पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुई गल्ली येथे एका घरात गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सदरील ठिकाणी कारवाई करत गुटखा व मोटार सायकल असा एकूण १ लाख ३९ हजार १७ रूपयांचा मुद्देंमाल जप्त करण्यात आला. 

     बीड (Beed)शहरातील भुई गल्ली येथील मयत वाजेद हसन बागवान यांचे घर भाड्याने घेवून त्यामध्ये गुटखा ठेवण्यात आला होता. याची माहिती पेठ बीड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जावून कारवाई करत  १ लाख ९ हजार १७ रूपयांचा गुटखा व मोटार सायकल असा एकूण १ लाख ३९ हजार १७ रूपयांचा मुद्देंमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपी शेख खदीर शेख बशीर, शेख अर्सला शेख खदीर या दोघांजणाविरोधात पेठ बीड (Beed police)पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक अशोक मोदीराज, पो.हे.कॉ. रमेश, अल्ताफ, अनिल यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement