Advertisement

पेट्रस गायकवाड असणार बीड कारागृहाचे नवे अधिक्षक

प्रजापत्र | Thursday, 12/06/2025
बातमी शेअर करा

बीड: बीडच्या जिल्हा कारागृहाचे अधिक्षक मुलानी यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या या पदावर पेट्रस गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २ वर्षापूर्वी गायकवाड यांना जळगाव येथून निलंबित करण्यात आले होते, आता त्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांची बीडचे कारागृह अधिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. 
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडचे जिल्हा कारागृह चर्चेत आहे. येथील अधिक्षक मुलानी यांची काही दिवसांपूर्वी बदली झाली होती तर येथील अतिरिक्त पदभाराच्या काळात एक तुरुंग अधिकारी निलंबित झाले होते. या पार्श्वभूमीवर आता दोन वर्षांपूर्वी निलंबित झालेल्या पेट्रस गायकवाड यांचे निलंबन मागे घेऊन त्यांची कारागृह अधिक्षक बीड म्हणून नियुक्ती झाली आहे.

Advertisement

Advertisement