बीड दि.८ (प्रतिनिधी):शहरातील(Beed) कालिका नगर परिसरातील एका घराचा दरवाजा दोडून अज्ञात चार चोरट्यांनी घरात प्रवेश करत चाकूचा धाक दाखवत ९३,५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवार (दि.७) रोजी रात्री २:३० च्या सुमारास घडली असून (Crime)चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड (Beed)शहरात चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.त्यातच पुष्पा बारीकराव नागरगोजे (वय ४५) रा.कालिका नगर,जनसेवा दवाखान्याच्या पाठीमागे असलेल्या घराचा दरवाजा दोडून अज्ञात चार चोरट्यांनी घरात प्रवेश करत त्यांच्या पुतण्याला चाकूचा धाक दाखवून घरातील १५ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र,दिड ग्रॅमचे कानातील फुल,साडेसात ग्रॅमचे सोन्याचे मणी,चांदीचे चैन जोड व एक ओपो कंपनीचा मोबाईल असा एकूण ९३,५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवार (दि.७) रोजी रात्री घडली असून अज्ञात चार चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (दि.७) जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला (Beed police)असून पुढील तपास पोलीस करत आहेत.