Advertisement

गढी येथे भीषण अपघात

प्रजापत्र | Tuesday, 27/05/2025
बातमी शेअर करा

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील(Accident) गेवराई नजीक गढीजवळ भीषण अपघातात सहा जणांचा गंभीर जखमी होवून मृत्यु झाला. अपघाताची ही घटना सोमवारी (दि.२६) रात्री १०.३० ते १०.४५ वाजेच्या सुमारास घडली. माहिती मिळताच गेवराई पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या (Beed)माहितीनुसार, आयशर टेम्पोने टोचन करुन नेण्यासाठी चारचाकी वाहनाजवळ थांबलेल्या सहा जणांना भरधाव वेगात धडक दिल्याने त्यांचा मृत्यु झाला.अपघातानंतर(Accident) टेम्पोसह चालक फरार झाल्याचे सांगण्यात आले.
रविवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर गढी येथील कारखान्यासमोर आतकरे यांच्या मुलाचा एक्स यू व्ही वाहन डिव्हायडरवर आदळून किरकोळ अपघात झाला होता. या अपघातात कुणीही जखमी झाले नव्हते. मात्र, डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी आतकरे आणि त्यांचे काही सहकारी घटनास्थळी आले असता, अचानक भरधाव वेगात आलेल्या आयशर टेम्पोने त्यांना जबर धडक दिली. या भीषण धडकेत बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दिपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यु झाल्याची माहिती मिळाली आहे. तर एक व्यक्ती गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर काही वेळातच गेवराई पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. 

Advertisement

Advertisement