Advertisement

बीड शहर आठ दिवसांसाठी लॉकडाऊन, जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय

प्रजापत्र | Wednesday, 01/07/2020
बातमी शेअर करा

बीड : मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या एका रुग्णाने बीड मधील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतला होता आणि त्या रुग्णालयाच्या माध्यमातून सदर रुग्णाचा अनेकांशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संपर्क आल्याचा धोका असल्याचे सांगत बीड शहर पुढील आठ  दिवसासाठी पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आहे. बुधवारी  रात्री उशीरा तसे आदेश काढण्यात आले आहेत. 
मंगळवारी बीड शहरात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले होते. यातील एका रुग्णाने बीडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याचे समोर आले. त्यामुळे सायंकाळनंतर आरोग्य विभाग कामाला लागला. या रुग्णालयाच्या माध्यमातून बीड शहरात अनेकजण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सदर रुग्णाच्या संपर्कात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे कोरोनाचा फौलाव अधिक होऊनये यासाठी बीड शहर पुढील सात दिवसांसाठी संपूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी घेतला आहे. 
अनलॉक 2 मधे कोरोनाची परिस्थिती लक्षात घेवून निर्णय घेण्याचे सर्वाधिकार राज्यशासनाने जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. त्यानूसार बीड शहरात सदरचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Advertisement

Advertisement