बीड दि.२१ (प्रतिनिधी): शहरातील (Beed)जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्र.३९ मध्ये चोरट्याने एका महिलेचा मोबाईल चोरल्याची घटना (दि.२०) मंगळवार रोजी मध्यरात्री घडली असून या प्रकरणी आरोपीविरोधात बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Crime)करण्यात आला आहे.
बीड शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. अश्यातच आशा संजय मुंडे (वय ४८)रा.निवंडूगवाडी ता.केज जि बीड ही महिला आपल्या मुलीला प्रसूतीसाठी (Civil hospital beed)जिल्हा रुग्णालयामध्ये घेऊन आली होती. सदरील महिलेच्या मुलीचा रिअलमी कंपनीचा मोबाईल आरोपी शेख इवान शेख रशिद (वय ३८) रा. शिवाजीनगर, अंबाजोगाई याने चोरला तसेच सोन्याचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी आशा मुंडे यांच्या (Beed)फिर्यादीवरून आरोपी शेख इवान याच्या विरोधात बीड शहर पोलिस ठाण्यात (दि.२०) मंगळवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.