कडा-चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये घेऊन ये असा तगादा सासरच्या मंडळीने विवाहीतेकडे लावला होता. तिने पेसे न आणल्याने पती, सासू- सासरे यांनी संगनमत करुन विवाहितेचा खून केल्याची घटना सांगवी पाटण येथे घडली. सुवर्णा कैलास खिलारे (वय-३०) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना २३ डिसेंबर २०२० रोजी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील सुवर्णा कैलास खिलारेला सासरच्या मंडळींनी चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावला होता. तिने यास नकार दिल्याने पती, सासु-सासरे यांनी संगनमत करुन तिच्या डोक्यात जड वस्तुने वार केला. यात गंभीर जखमी झालेल्या सुवर्णाचा २३ डिसेंबर २०२० रोजी मध्यरात्री मृत्यू झाला. या प्रकरणी गुरुवारी सतिश श्रीराम सुळे ( रा. लुखामसला ता.गेवराई ) यांनी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. यावरून पती कैलास श्रीमंत खिलारे (वय-३६), श्रीमंत नामदेव खिलारे (वय-५५) , शकुंतला नामदेव खिलारे (४९ रा. सागवी पाटण ता. आष्टी ) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा