बीड दि.१(प्रतिनिधी) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार येथील (Beed)जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात आले. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्घाटन आज उद्योग व बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते झाले.
यावेळी जिल्हाधिकारी (Beed)विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत तसेच या कक्षाचे प्रमुख चैतन्य कागदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कक्षाचे फीत त कापून उद्घाटन केल्यानंतर श्री नाईक यांनी या कक्षाची पाहणी केली तसेच येथील कामाबाबत माहिती घेतली तसेच अधिक चांगले काम करण्याबाबत यावेळी मार्गदर्शन केले.
येथील जिल्हाधिकारी(Beed) कार्यालयाच्या इमारतीमध्ये तळमजल्यावर हा कक्ष उभारण्यात आला आहे. ज्या गरजूंना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज लागणार आहे अशांना येथे अर्ज करता येईल. त्यांना मार्गदर्शनासोबतच उपचार सुरू असणाऱ्या रुग्णालयाशी समन्वय आणि आर्थिक मदत या ठिकाणी मिळू शकेल. यापूर्वी (Mumbai)मुंबई येथे अर्ज करावा लागत होता मात्र जिल्हा मुख्यालयातच ही सुविधा उपलब्ध झाल्याने गरजू रुग्णांची मोठी सोय होणार आहे.