गेवराई दि.२९(प्रतिनिधी): तालुक्यातील (Georai) वाहेगाव आम्ला येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. (Beed)एका तरुणाने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या आईनेही प्रचंड दुःखातून आत्महत्येचा मार्ग पत्करला. या दुहेरी घटनेमुळे संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
गेवराई तालुक्यातील वाहेगाव (Georai)आम्ला येथील अभिमान खेत्रे (वय 45) या तरुणाने काल (दि.२८) सोमवार रोजी दुपारी फाशी घेत आपले जीवन संपवले. ही माहिती आई कौशल्या भागुजी खेत्रे (वय 60) यांना कळताच त्या प्रचंड मानसिक तणावात (Georai)आल्या आणि त्यांनीही काही वेळातच विषारी औषध सेवन केले. अभिमानचा मृत्यु काल सायंकाळी चार वाजता झाला, तर आई कौशल्याबाईंचा मृत्यु आज (दि.२९) मंगळवार रोजी सकाळी १० वाजता उपचारादरम्यान झाला.एका घरात एकाच वेळी दोन मृत्यु झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस(Police) पुढील तपास करत आहेत.