Advertisement

२३ वर्षीय विवाहित महिलेची आत्महत्या

प्रजापत्र | Friday, 25/04/2025
बातमी शेअर करा

बीड, (प्रतिनिधी): चर्‍हाटा(Beed) फाटा परिसरात राहणार्‍या एका २३ वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (दि.२५) रोजी सकाळी घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना (Crime)मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

  सविस्तर माहिती अशी कि,वैष्णवी किशोर(Beed) बहिर (वय २३) रा.शिरापूर ह.मु. चर्‍हाटा फाटा या महिलेने आज सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. (Beed police)या महिलेच्या पश्‍चात एक मुलगी, एक मुलगा, पती असा परिवार आहे. महिलेच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास बीड ग्रामीण पोलिस करीत आहेत.

Advertisement

Advertisement