बीड दि.२३ (प्रतिनिधी): अन्न व नागरी पुरवठा विभागाने रेशनकार्डची तपासणी करण्याची मोहीम हाती (Beed)घेतली आहे. त्याअंतर्गत रेशनकार्ड धारकांकडून माहिती मागविण्यात येत आहे.या मोहिमेमध्ये ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाखांपेक्षा जास्त असेल आणि अशा व्यक्तींकडे केशरी रेशनकार्ड असेल तर ते रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहे. त्या व्यक्तींना पांढरे रेशनकार्ड दिले जाणार आहे. (Reshan card) अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी (केशरी) व शुभ्र (पांढरे) रेशनकार्डची तपासणी करण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम ३१ मे पर्यंत चालणार आहे. यासाठीच्या मार्गदर्शक सूचना शासनाकडून जारी करण्यात आल्या आहेत.या मोहिमेअंतर्गत रेशन दुकानांमध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दुबार, स्थलांतरित,मयत लाभार्थ्यांची नावे वगळण्यात येणार आहेत,तर विदेशी नागरिकांचे रेशनकार्ड शोधून ते रद्द करण्यात येणार आहेत

प्रजापत्र | Wednesday, 23/04/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा