गेवराई दि.२१(प्रतिनिधी): तालुक्यातील( Crime) माणकापूर येथे चोरट्याने घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत घरातील नगदी रक्कमेसह सोन्याचे दागिने असा एकुण १ लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना (दि.१९) शुक्रवार रोजी घडली असून या प्रकरणी अज्ञात (Beed police)चोरट्यांविरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भागवत भाऊसाहेब जोगदंड (वय ४३) रा.माणकापूर यांच्या घराचे अज्ञात चोरट्याने कुलूप (Crime news)तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, मनी मंगळसुत्र, १२ ग्रॅम वजनाचे तसेच नगदी रक्कम असा एकूण १ लाख ६५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी भागत जोगदंड यांच्या फिर्यादीवरून चकलांबा(Police) पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
बातमी शेअर करा