माजलगाव- शहरातील शाहूनगर भागात एका(Crime) भाजप कार्यकर्त्याची भर दुपारी रस्त्यावर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आरोपीला माजलगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी दिली. बाबासाहेब आगे (रा. किट्टी अडगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आज दुपारी भाजप कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरच ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनैतिक संबंधातून हा (Majalgaon) प्रकार घडला असल्याचे सांगितले जाते. नारायण फापाळ असे आरोपीचे नाव असल्याचे कळते. सध्या तो शहर पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
बातमी शेअर करा