आष्टी दि.१४(प्रतिनिधी): शहरातील (Ashti) बस स्टँड येथून प्रवास करत असताना अज्ञात चोरटयांनी पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना (दि.१३) रविवार रोजी ११ वाजता घडली असून चोरटयांनी १,०६,००० रुपयांचा मुद्देमाल(Bus stan) लंपास केल्या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील शिराळा येथील रंजना गणपत (Crime)गायकवाड (वय ४५) यांचे मुलगा व मुलगी आष्टी बस स्टॅन्ड येथून पुणे बसने जात असताना अज्ञात चोरटयांनी पर्स मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १,०६,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना (दि.१३) रविवार रोजी घडली आहे. यात दीड तोळ्याची सोन्याची चैन अंदाजे किंमत ६०००० रुपये,पाच ग्रॅम सोन्याची अंगठी अंदाजे किंमत २२००० रुपये ,तीन ग्रॅमचे कानातील फुले अंदाजे किंमत १०००० रुपये,सोन्याचे फुल अंदाजे किंमत ९००० रुपये व रोख रक्कम ५००० रुपये असा एकूण १,०६,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्या प्रकरणी आष्टी पोलीस (Ashti police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.