Advertisement

जिल्हा रुग्णालयात आणखी एका मातेचा मृत्यु

प्रजापत्र | Monday, 14/04/2025
बातमी शेअर करा

बीड दि.१४(प्रतिनिधी): डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रविवारी सकाळीच एका (Beed)मातेचा नॉर्मल प्रसूतीनंतर मृत्यु झाला होता. याची चौकशी सुरू असतानाच सोमवार(दि.१४) रोजी सकाळी आणखी एका मातेची प्राणज्योत मालवली. सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्याने जिल्हा (Beed)रूग्णालयात चाललंय काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान आठवड्यातील हा तिसरा माता मृत्यु आहे.

 

रूक्मीन परशुराम टोणे (वय ३५ रा. पांगरबावडी ता.जि. बीड) असे मयत मातेचे नाव आहे. (दि.१३)एप्रिल रोजी सकाळी १०:१३ वाजता रूक्मीन या जिल्हा(Beed civil hospital) रूग्णालयात अॅडमिट झाल्या होत्या. त्यानंतर लगेच सकाळी ११:४० वाजता त्यांचे सिझर झाले. त्यांनी २३०० ग्राम वजणाच्या मुलाला जन्म दिला. ही त्यांच चौथी प्रसूती होती. त्यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू होती. (दि.१४)एप्रिल २०२५ रोजी सकाळी ६:२५ मिनीटांनी त्यांचा उपचार सुरू असतनाच मृत्यु झाला. त्यांचे शवविच्छेदन जिल्हा रूग्णालयात करण्यात आले. रूक्मीन यांना आगोदरच हृदयासह इतर आजार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच अॅडमिट होताच रेफरचा सल्लाही दिला होता, परंतू ते गेले नाहीत. मृत्युनंतर (Beed)नातेवाईकांचा काही आरोप नसल्याचेही सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement