Advertisement

अपहरण केलेल्या मुलाची अवघ्या तासाभरातच सुटका

प्रजापत्र | Sunday, 13/04/2025
बातमी शेअर करा

बीड दि.१३ (प्रतिनिधी): येथील (Beed)पांगरी रोड भागातून एका शाळकरी मुलाचे अपहरण करण्यात आले होते. या घटनेने बीड शहरात खळबळ उडाली. सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली होती. अवघ्या तासाभरातच स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी अशोक दुबाले आणि मुन्ना वाघ यांनी याप्रकरणाचा  तपास गतिमान करत आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या या कामगिरीचे सध्या सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे.
पांगरी रोड भागातून एका ९ वर्षीय मुलाला जगदीश गायकवाड (रा.अंबिका चौक) या आरोपीने अपहरण करून पळविले होते. आरोपी (Beed)बीड बसस्थानकाकडे आला होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचारी अशोक दुबाले आणि मुन्ना वाघ यांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. दरम्यान अवघ्या तासाभरातच स्थानिक गुन्हे शाखेने मुलाची सूटका करत मोठी कामगिरी बजावली आहे. सदर मुलाच्या वडिलांना फोन करून गायकवाडने पाच लाखांची (Lcb)मागणी देखील केली होती. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. पोलीस अधिक्षकांनी यात स्वत: लक्ष घालून तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या. आरोपी सध्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात असून त्याला शिवाजीनगर (Beed police)पोलीसांच्या स्वाधिन करण्यात येणार आहे. दुबाले आणि वाघ यांनी केलेल्या कामगिरीचे सध्या सर्वस्तरातून कौतूक करण्यात येत आहे
.

Advertisement

Advertisement