बीड दि.१३ (प्रतिनिधी): विश्वभूषण,बोधिसत्व,युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तुत्वाची कीर्ती संपूर्ण जगभर आहे.सोमवार (दि.१४) एप्रिल रोजी त्यांची १३५ वि जयंती आहे. महामानवाचा हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करावा असे आवाहन बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी केले आहे.
मानवी मूल्यांचे पुरस्कर्ते म्हणून जगभरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी केली जाते.लोकशाही,समता स्वातंत्र्य हा मूलमंत्र त्यांनी भारतासह जगाला दिला आहे. त्यामुळे त्यांच्या अनुयायांची संख्या जगभर आहे.या अनुयायांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव थाटात उत्सवात आणि जल्लोषात साजरा केला जातो.यानिमित्त विविध कार्यक्रम,रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रम केले जात आहेत.बीड जिल्ह्यात तर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा फेवर सिंगेला पोहोचला आहे.विविध प्रबोधनात्मक,सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून आकर्षक चित्ररथ देखावे,विद्युतरोषणाई करण्यात आली आहे.शहरात सर्वच मुख्य रस्त्यावर सर्वत्र निळेध्वज,पताका, शुभेच्छा फलक यामुळे शहर निळे भीममय झाले आहे.भीम जयंतीचा हा फ्लेवर सर्वत्र भीम अनुयायांच्या घरोघरी दिसून येत आहे. त्यामुळे हा उत्सव जल्लोषात उत्सवात आणि धुमधडाक्यात साजरा करावा असे आवाहन बहुजन नेते बाबुराव पोटभरे यांनी केले आहे.