Advertisement

भरधाव कारणे महिलेला चिरडले 

प्रजापत्र | Monday, 07/04/2025
बातमी शेअर करा

 आष्टी दि.७ (प्रतिनिधी): मुलगा (Ashti)दुचाकी रोडच्या बाजूला थांबवून लघुशंकेसाठी गेला आई दुचाकीजवळ थांबलेली असताना आष्टीवरून देसुरकडे भरधाव वेगात येणाऱ्या कारने तिला चिरडत दोनशे फुट अंतरावर ओढत नेले. या अपघातात तिचा जागीच मृत्यु झाल्याची घटना(Accident) रविवार (दि.६) रोजी सायंकाळी आष्टी डोईठाण रोडवरील चिंचाळा येथे घडली.  

              आष्टी (Ashti)तालुक्यातील बीडसांगवी येथील कमलाबाई रघुनाथ मोरे (वय ५०) ही महिला रविवारी मुलासोबत एम. एच २३, बीबी. ३५१० या दुचाकीवरून पाहुण्याचा साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेली होते. कार्यक्रम आवरून मायलेकरं दुचाकीवरून घराकडे निघाले असता (Beed)चिचाळा परिसरात मुलगा लघुशंकेसाठी थांबला  होता. कमलबाई दुचाकीजवळ थांबल्या होत्या. याच दरम्यान आष्टीवरून देसूरकडे जात असलेल्या मद्यधुंद अवस्थेत असलेला कार चालक हा एम. एच २३.ए.एस.३०७० ही कार (Accident)भरधाव वेगात चालवत महिलेच्या अंगावर आला. महिलेला दुचाकीसह दोनशे फुट अंतरावर ओढत नेले. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यु झाल्याची घटना रविवार (दि.६) रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली. 

Advertisement

Advertisement