आष्टी दि.५ (प्रतिनिधी):आष्टी (Ashti) शहरा जवळील बेलगाव चौकात (दि.५) शनिवार रोजी सकाळी (Private school bus)आठच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने खाजगी स्कूल बस झाडावर आदळली. यात चालकासह विद्यार्थि जखमी झाल्याची माहिती आहे.
अहिल्यानगर -बीड (Beed)राष्ट्रीय महामार्ग परिसरातील विद्यार्थी आष्टी येथे विविध खाजगी शाळेत शिक्षण घेतात. त्यांना ने-आण करण्यासाठी एक खाजजी स्कूल बस आहे. आज (दि.५) शनिवार रोजी सकाळी नेहमी प्रमाणे विद्यार्थी घेऊन स्कूलबस आष्टीकडे निघाली. सकाळी आठच्या (school bus)सुमारास बेलगाव चौकात चालकाचा ताबा सुटल्याने स्कूल बस ( क्रमांक एम.एच १२,एच.बी.१५१४) रस्त्याच्या बाजूच्या झाडावर आदळली. यात चालकासह काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. (Ashti) आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.