Advertisement

सायबरचे पीएसआय (psi) निलंबित 

प्रजापत्र | Wednesday, 26/03/2025
बातमी शेअर करा

बीड दि.२६(प्रतिनिधी): पाच महिन्यापूर्वी नियंत्रण(Beed) कक्षातून सायबर विभागात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक रणजित कसले यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक(Beed police) नवनीत कॉवत यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत.
      रणजित कासले सायबर विभागातील एका प्रकरणाच्या तपासासाठी बाहेर राज्यात गेले होते. यावेळी त्यांनी संबंधित प्रकरणात पैशांची तडजोड केली असल्याचा थेट व्हिडीओच बाहेर आला. हे प्रकरण बीड जिल्हापुरते मर्यादित न राहता थेट राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था प्रमुख असलेल्या अधिकाऱ्यांकडे गेले होते. अखेर यात तपासाअंती रणजित कासले दोषी आढळल्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती आहे.दरम्यान(Beed) पोलीस अधिक्षक यांनी चुकीचे काम करणाऱ्या आणखी एका अधिकाऱ्याला दणका दिल्यामुळे खाकीतच खळबळ उडाली आहे.

Advertisement

Advertisement