माजलगाव दि.२५ (प्रतिनिधी) तालुक्यातील (Majalgaon)इरला मजरा येथे अज्ञात चोरटयांनी घरफोडी केल्याची घटना (दि.२३) रविवार रोजी घडली असून ३,९७,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा(Crime news) दाखल करण्यात आला आहे.
माजलगाव (Majalgaon)तालुक्यातील इरला मजरा येथील अतुल बाबुराव काथवडे (वय २५) रा.इरला मजरा ता.माजलगाव हे शेतात गेले असता दुपारी दीड ते साडेपाचच्या दरम्यान अज्ञात चोरटयांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील सोने व नगदी रुपये असा एकूण ३,९७,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून अतुल काथवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (दि.२४) सोमवार रोजी माजलगाव (Majalgaon gramin)ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत .
बातमी शेअर करा