बीड दि.२५(प्रतिनिधी):शहरातील (Beed)बस स्थानकातून परळी ते भगवानगड बसमध्ये(Bus stand) चढत असताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील गंठण लंपास केल्याची घटना (दि.२२) शनिवार रोजी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान घडली असून अज्ञात चोऱ्यांविरुद्ध शिवाजीनगर (Shivajinagar police)पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड (Beed)शहरातील बस स्थानकातून परळी ते भगवानगड बसमध्ये चढत असताना शोभाबाई विश्वभंर कापरे (वय ५६) रा.तींतरवणी ता.शिरूर कासार यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण अंदाजे किंमत ३०,००० रुपये असा एकूण मुद्देमाल अज्ञात (Beed police)चोरटयांनी (दि.२२) शनिवार रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास लंपास केल्याची घटना घडली असून शोभाबाई कापरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (दि.२४) सोमवार रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.