बीड दि.२४(प्रतिनिधी): मारहाणीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या दादा खिंडकरला (Beed)पोटदुखीच्या कारणामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. किडनीस्टोनच्या आजारामुळे त्याच्यावर उपचार सुरु (Civil hospital beed)असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. अशोक थोरात यांनी दिली असून उद्या सकाळपर्यंत त्याची तब्येत बरी होईल असे डॉ. थोरात म्हणाले.
पिंपळनेर पोलीस ठाण्यात धनंजय देशमुख यांचा मेहुणा असलेल्या दादा खिंडकरवर मारहाणीचा व्हिडीओ व्हायरलं झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. १० दिवस पोलीस कोठडीनंतर त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. काल खिंडकरच्या पत्नीने आपल्या नवऱ्याच्या जीवाला वाल्मिक कराडमुळे धोका असल्याचे न्यायालयात सांगितले होते. खिंडकरची रवानगी दुसऱ्या कारागृहात होतं असताना त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या(Beed) माहितीनुसार खिंडकरला किडनीस्टोनचा आजार आहे. आज रात्रीपर्यंत त्याच्यावर उपचार करून उद्या त्याला सुट्टी देण्यात येईल अशी माहिती डॉ. अशोक थोरात यांनी प्रजापत्रशी बोलताना दिली.

बातमी शेअर करा