Advertisement

कारागृहाच्या आवारात खोक्याची शाही बडदास्त

प्रजापत्र | Monday, 24/03/2025
बातमी शेअर करा

बीड दि.24 (प्रतिनिधी)ः राज्यात चर्चेत असलेल्या सतिश भोसले उर्फ खोक्याला सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याला न्यायालयीन कोठडीत दाखल करण्यापूर्वी कारागृहाच्या आवारातच त्याची कार्यकर्त्यांनी शाही बडदास्त ठेवली. तसा एक व्हिडीओ आता व्हायरल झाला असून यामुळे बीड जिल्ह्यातील प्रशासन नेमके सुधारणार तरी केव्हा हा प्रश्‍न उपस्थितीत होत आहे.
सतिश भोसले उर्फ खोक्या याच्यावर मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. त्याला सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याला कारागृहात दाखल करण्यासाठी बीडच्या जिल्हा कारागृहात आणण्यात आले. मात्र या ठिकाणी त्याची शाही बडदास्त ठेवण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. कारागृहाच्या आवारात खोक्या अनेक कार्यकर्त्यांना मुक्तपणे भेटत असून त्याच्यासाठी जेवनाचे खास डब्बे आल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. कार्यकर्त्यांच्या भेटी, गाठी, जेवन आणि मोकळे वातावरण याचा अस्वाद खोक्या घेताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील प्रशासन आरोपींना अतिरेकी सन्मान देण्याच्या मानसिकेतेतून नेमके केव्हा बाहेर पडणार असा सवाल उपस्थितीत केला जात आहे.

Advertisement

Advertisement