पाटोदा दि.२४(प्रतिनिधी):तालुक्यातील (Patoda)पाचंग्री येथून घरासमोर लावलेल्या दोन दुचाकी अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याची घटना (दि.१९) बुधवार रोजी घडली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Crime)करण्यात आला आहे.
पाटोदा (Patoda)तालुक्यातील पाचंग्री येथील अजिंक्य पांडुरंग मुंढे (वय ४०)रा.पाचंग्री ता.पाटोदा जि.बीड (Beed)यांच्या घरासमोरून त्यांची व त्यांच्या नातेवाईकांची लावलेली दुचाकी अज्ञात चोरटयांनी (दि.१९) बुधवार रोजी रात्री २ ते सकाळी ६ च्या दरम्यान दोन दुचाकी लंपास केल्या यात लाल रंगाची पॅशन प्रो क्र.एमएच २३ आर ८१८४ अशी जुनी वापरात असलेली अंदाजे किंमत २०,००० रुपये व काळया रंगाची हिरो होंडा कंपनीची क्र.एमएच २३ व्ही २४६१ अंदाजे किंमत १०,००० रुपये असा एकूण ३०,००० रुपये अश्या दोन दुचाकी अज्ञात चोरटयांनी लंपास केल्या प्रकरणी अजिंक्य पांडुरंग मुंढे यांच्या फिर्यादीवरून (दि.२३) रविवार रोजी (Patoda police)पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.