Advertisement

संपादकीय अग्रलेख - दंगलीची होरपळ नको

प्रजापत्र | Thursday, 20/03/2025
बातमी शेअर करा

 महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरणात मागच्या दोन वर्षणापासूनच कमालीची अस्वस्थता असताना आता कबरीचा वाद आणि औरंगजेब या विषयांनी त्या अस्वस्थतेला अधिकच हवा दिली गेली आहे. याच विषयावरून दोन दिवसांपूर्वी नागपूर पेटले. जे नागपूर बाबरी मस्जिद पाडण्यात आल्यावरही शांत होते, ते नागपूर अचानक पेटते हे सारेच गंभीर आहे. मुळातच कोणत्याही अस्मितांच्या वादातून होणारी दंगल समाजाला तर घटक असतेच, पण या दंगलीत ज्यांचे हात गुंततात त्यांच्यासाठी अधिकच घातक असते. त्यामुळे दंगलीच्या आगीत आपले हात होरपळणार नाहीत याची काळजी तरुणाईने घेणे आवश्यक आहे.
 

 

महाराष्ट्राच्या समाजकारणातील तसे शांत शहर अशी नागपूरची ओळख आहे. या भागातला वातावरणातला उष्मा कितीही असला तरी येथे सामाजिक शांतततेची होळी कधी झालेली नाही.   दीक्षाभूमी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय अशा दोन महत्वाच्या सामाजिकदृष्ट्या  स्थानांचा समावेश असलेल्या या शहराला तसा दंगलींचा इतिहास फारसा नाही, मात्र त्या नागपुरात दोन दिवसांपूर्वी दंगल उसळली . त्याची करणे काय, दोषी कोण, पोलीस कोणावर कारवाई करणार का या प्रश्नांची उत्तरे यथावकाश मिळतील. अशा प्रकरणात पर्थदर्शनी जे दाखविले, सांगितले जाते तेच अंतिम सत्य असते असे समजणे भाबडेपणाचे ठरेल, त्यामुळे त्यावर आजच भाष्य करणे गाईचे होईल. पण नागपूर सारखे शहर दंगलीत होरपळणार असेल तर महाराष्ट्रात काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज लावणे आवश्यक ठरते.

 

 

मुळातच आज महाराष्ट्रासमोर अनेक जगण्यामरण्याचे प्रश्न आहेत. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला फारशी प्रगती करता आलेली नाही. मराठवाडा काय किंवा विदर्भ काय, या भागांचे औद्योगिक निर्देशांक समंडणकारक नाहीत. राज्यभरातच रोजगार, महागाई , शेतीमालाला भाव आणि मुळातच कायदा सुव्यवस्था, विशेषतः महिलांची सुरक्षा असे प्रश्न  गंभीर स्वरूप धारण करीत आहेत, मात्र राज्यकर्त्यांना त्यावर भाष्य करायचे नाही. सामान्यांच्या रोजच्या जगण्याशी संबंध असलेल्या विषयांना भिडण्याची राजकीय इच्छाशक्ती ज्यावेळी नसते, त्यावेळी जाणीवपूर्वक अस्मितेचे प्रश्न निर्माण करून ते पेरले जात असतात . औरंगजेब हा देखील असाच एक विषय. महाराष्ट्राला छत्रपती  शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम ठाऊक आहे. तसेच त्यांचे मोठेपण त्यांच्या युद्धकौशल्याप्रमाणे जसे होते, तसेच त्यांच्या राजकीय भूमिका आणि सर्वसमावेशक राजकीय धोरणांमुळे देखील होते, हे देखील महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे खरेतर आज औरंगजेबाच्या कबरीच्या विषय महाराष्ट्रात निघण्याचे काहीच कारण नव्हते. औरंगजेबाची कंबर म्हणजे काही उदात्तीकरणाचे स्थळ कधीच नव्हते ,झालेच तर महाराष्ट्राच्या शत्रूचे कायहोते आणि तो कितीही आक्राळविक्राळ असेल तरी त्याला गाडण्याची क्षमता इथल्या मातीत कशी आहे हे दाखविणारे स्थळ म्हणून त्याकडे पहिले जाते हा इतिहास आहे.  औरंगजेबाच्या गौरवकाच्या दृष्टीने त्या कबरीकडे कोणीच कधीच पाहिलेले नाही. त्यामुळे आता अचानक त्या कबरीच्या विषय काढायचा, ती कंबर उद्धवस्त केली पाहिजे असा अजेंडा घेऊन समोर यायचे यात महाराष्ट्राचे नेमके कोणते हित आहे याचेही उत्तर असा अजेंडा रेटणारांनी , मग ते सरकारमधले असतील किंवा सरकारच्या बाहेरचे त्यांनी देणे अपेक्षित आहे. मुळात देशभरात अशा अनेकांच्या अनेक कबरी आहेत, अगदी ताजमहल देखील शेवटी कबरच आहे, मग उद्या उद्धवस्त तरी काय काय करणार आहोत ? आणि अशा मागण्यांमधून सामान्यांच्या आयुष्यात असा काय फरक पडणार आहे? मात्र त्यावर भाष्य करण्याची सरकारची मानसिकता नाही. आणि त्यामुळेच आज राज्यातील सामाजिक अस्वस्थता वाढीस लागली आहे.
मुळात नागपूर काय किंवा आणखी कोणतेही ठिकाण काय, दंगलीमुळे कोणाचेच भले होत नाही. दंगली करायला लावणारे, खऱ्या खोट्या अस्मितेच्या नावाने ब्रेनवॉश करून दंगली घडवायला तरुणाईला उद्युक्त करणारे कधीदंगलीची शिकार होत नाहीत, त्यांचे निकटवर्तीय कधी यात नसतात हे वास्तव तरुणाईने समजून घेणे आवश्यक आहे. दंगल किंवा तोडफोड कोणत्याच प्रश्नाचे उत्तर नसते, मकिंवा या मार्गाने व्यक्त केला गेलेला संताप कधी पटणारा आणि पचणारा नसतो. तो कोणत्याच महापुरुषाच्या , कोणत्याच धर्माच्या शिकवणुकीचा किंवा धर्मरक्षणाचा देखील भाग नसतो , मात्र असे  भान समाजात निर्माण होऊ दिले जात नाही. दंगलीचा शिक्का बसला तर किती होरपळवे लागते, हे जे यात होरपळलेत त्यांचा ठाऊक. त्या वेदना अनुभवण्याची वेळ कोणावरच येऊ नये. लोकांच्या किंवा सार्वजनिक मालमत्ताना आगी लावताना उद्या या आगीत आग लावणारच व्यक्तिगत आयुष्य देखील होरपळणार आहे याचे भान येणे आवश्यक आहे.

Advertisement

Advertisement