Advertisement

भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी

प्रजापत्र | Friday, 21/02/2025
बातमी शेअर करा

बुलढाणा : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री (Eknath Shinde)एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडून देण्याचे प्रकरण ताजे असतानाच आता चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. त्यांना ठार मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.या घटनेने त्यांचे समर्थक प्रक्षुब्ध झाले असून चाहत्यांतून तातडीने कारवाईची मागणी होत आहे. अशा कृत्याला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने त्यांच्या चिखली येथील निवासस्थानी एकत्र जमले आहेत.

Advertisement

Advertisement