Advertisement

आठवले गँगवरही मकोका

प्रजापत्र | Monday, 27/01/2025
बातमी शेअर करा

बीड : बीडमधील आणखी एका गँगकवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलीय. डिसेंबर महिन्यात गोळीबार करणाऱ्या आठवले गॅंगवर देखील पोलिसांनी आता मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी पोलीस अधिकारी शितल बल्लाळ यांच्यावर आरोप करत ऑडिओ क्लीप व्हायरल करणाऱ्य सनी आठवलेची ही (Sunny Aathwale) आठवले गँग आहे. 

 

बीड (Beed Police)पोलिसांनी मागील महिनाभरात जिल्हाभरात दहशत माजविणाऱ्या दोन गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. सुदर्शन घुले याच्या गँगवर मकोका लावल्यानंतर आज बीड (Beed Police)पोलिसांनी आठवले गॅंगवर देखील मकोकाची कारवाई केलीय. (दि.१३ डिसेंबर २०२४) मध्ये पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत गोळीबारची घटना घडली होती. त्यातील सहा आरोपींवरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने अक्षय आठवले, (Sunny Aathwale) सनी आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवई यांचा समावेश आहे. या आरोपींनी आतापर्यंत १९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा तपास केल्यानंतर आता आठवले गँगवर मकोका कारवाई करण्यात आली आहे.

 

या सहा आरोपींवर कारवाई 

 १)अक्षय आठवले ,२)सनी आठवले ,३)आशिष आठवले ,४)मनीष क्षीरसागर ,५)प्रसाद धिवार,६)ओंकार  सवई 

 

टोळ्यांची माहिती घेऊन कारवाई होणार - कावत
ज्या ठिकाणी गंभीर गुन्हे घडत आहेत. त्या ठिकाणी मकोका प्रस्ताव पाठवला जाणार आहे. तसेच गंभीर स्वरूपातील गुन्हेगाराची पार्श्वभूमी आणि टोळीची माहिती घेऊन ही कारवाई सुरू राहणार असल्याचं पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी म्हटलं आहे.

Advertisement

Advertisement