Advertisement

गेवराईत एकाच दिवसात पकडले चौदा वाहने

प्रजापत्र | Sunday, 24/01/2021
बातमी शेअर करा

गेवराई दि.२४ ( वार्ताहार )तालुक्यात अवैध वाळू वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरू असते. तहसीलदार सचिन खाडे यांनी रविवारी चौदा वाहने पकडत मोठी कारवाई केल्याने वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.रविवारी दि.(२४) पहाटे पाच वाजता गंगावडीत दोन हायवा,ऐक रोटर, दोन ट्रॅक्टर, ऐक केमी तहसीलदारांच्या पथकाने ताब्यात घेतली.सायंकाळी पाचच्या सुमारात आगरनांदूरमध्ये पाच ट्रॅक्टर, चार मोटरसायकल ताब्यात घेण्यात आल्या. एकाच दिवसात चौदा वाहने तहसीलदार सचिन खाडे यांच्या पथकाने ताब्यात घेतली असल्याने गेवराईतील वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

Advertisement

Advertisement