Advertisement

पिकाला पाणी देणाऱ्या शेतकऱ्याचा वीजेच्या धक्क्याने मृत्यु 

प्रजापत्र | Tuesday, 21/01/2025
बातमी शेअर करा

बीड दि.२१ (प्रतिनिधी)- उपद्रवी जनावरांपासून पिकांचे संरक्षण व्हावे यासाठी (Farmer dies of electric shock) शेतकऱ्याने उभ्या पिकात तारेच्या कुंपनाला सोडलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने पाणी देत असलेल्या एका (वय ३६) वर्षीय (Farmer)शेतकऱ्याचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना सोनगाव (ता.बीड) येथे सोमवार (दि.२०) रोजी रात्री 
घडली.

बीड(Beed)तालुक्यातील सोनगाव येथील आप्पासाहेब सगनाजी दिगे (वय ३६) हे (दि.२०) सोमवार रोजी रात्री १:००  च्या सुमारास शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. मात्र विद्युत (electric shock)प्रवाह असलेल्या तारेचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला.  

Advertisement

Advertisement