Advertisement

तलवाड्यात पकडला गुटखा;दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रजापत्र | Tuesday, 21/01/2025
बातमी शेअर करा

बीड दि.२१ (प्रतिनिधी)- नवनीत काॅवत यांनी पोलीस (beed police)अधीक्षक पदाचा पदभार घेतल्यापासून अवैध धंद्यावर मोठ्या प्रमाणात कारवाईचा धडाका सुरू आहे. (Gevrai)गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील तलवाडा येथे एका गुटखा माफीयाच्या टाटा इंडिगो कंपनीच्या गाडीमध्ये विविध कंपनीचा गुटखा असल्याची (Talwada) तलवाडा पोलीस स्टेशनचे सपोनि सोमनाथ नरके यांना गोपीनिय माहिती मिळताच (दिं.२०) रोजी पाच वाजता पोलिसांचा फौज फाटा घेऊन स्पॉटला पोहोचले व होडीची तपासणी केली असता टाटा इंडिको कंपनीची क्र. MH २१ V ५००१ या गाडीत विविध कंपनीचा गुटखा आढळला आहे. या प्रकरणी (Talwada police) तलवाडा पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार नारायण काकडे यांच्या फिर्यादीवरून कलम २७४,२७५, १२३,प्रमाणे भारतीय न्याय दंड संहिता प्रमाणे शेख सद्दाम मुसा (रा,तलवाडा ता.गेवराई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण दोन लाख ३३ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सपोनि सोमनाथ नरके, यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास उपनिरीक्षक स्वप्निल कोळी करीत आहे.

Advertisement

Advertisement