Advertisement

एचआयव्हीची अफवा पसरवून गावाने कुटुंबाला टाकलं वाळीत!

प्रजापत्र | Tuesday, 21/01/2025
बातमी शेअर करा

 आष्टी - एचआयव्हीच्या (Hiv)अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार (Ashti )आष्टी तालुक्यात समोर आला आहे. ही अफवा पसरविण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. पोटचा गोळा गेल्याचे दु:ख पचत नाही, तोच गावाने वाळीत टाकल्यामुळे या कुटुंबाने हतबलता व्यक्त केली आहे.

मुलीचा  (Hiv)एचआयव्हीमुळे मृत्यू झाल्याची खोटी माहिती (police)पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे कुटुंबाची समाजात बदनामी झाली. तसेच गावातील लोकांनी आम्हाला वाळीत टाकले. कुणीही भेटायला जवळ येत नाही. आमच्यासोबतचे व्यवहारही थांबवले आहेत, अशी आपबीती पीडित कुटुंबाने सांगितली. तसेच या आरोपांमुळे घरातल्या महिलेने दोन वेळा जीवन संपविण्याचा प्रयत्न केला, असा दावाही कुटुंबाने केला आहे.

 

डॉक्टर, पोलिसांविरोधात तक्रार
पीडित कुटुंबाने डॉक्टर आणि पोलिस कर्मचाऱ्याविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. एक ऑडिओ क्लिपही त्यांनी दाखविली. ही क्लिप पोलिस कर्मचाऱ्याची असल्याचे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे. तुमच्या मुलीला एचआयव्ही होता. तिच्या अंत्यविधीला जवळ ज्या व्यक्ती होत्या, त्यांची तपासणी करून घ्या, असे या क्लिपमधली व्यक्ती म्हणत आहे. ही व्यक्ती पोलिस असल्याचा दावा कुटुंबाने केला आहे.

 

 

आम्हाला न्याय द्या
मुलीच्या सासरच्या लोकांच्या सांगण्यावरून पोलिस आणि डॉक्टरांनी अशी अफवा पसरवल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. ‘आमची मुलगी गेली, पण जवळचे लोकही भेटायला आले नाहीत. या अफवेमुळे कुणीही आमच्याजवळ येत नाही. आरोग्य विभागाने खोटा अहवाल दिला आहे, सासरच्या मंडळींच्या सांगण्यावरून हे झाले आहे, आम्हाला न्याय द्या,’ अशी मागणी कुटुंबाने केली आहे.

Advertisement

Advertisement